प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: येथील जामनेर रोड लगत असलेल्या साईदत्त नगर , सोमनाथ नगर , गुलमोहर नगर फेज – १, साईदत्त नगर फेज – २, रामानंद नगर, शिवशक्ती काँलनी , गुलमोहर काँलनी या परिसरातील रहिवाशांनी नुकतीच वस्रोद्योग मंत्री ना.संजयभाऊ सावकारे यांची भेट घेतली व गेल्या १५ ते २० वर्षापासून या परिसरात रस्ते नसल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो आहे तरी लवकरात लवकर रस्ते तयार करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या निवेदनावर मोहन खंबायत, सुरेश सुरवाडे, एस ए सुतार,आश्विन सोनवणे, राहुल पारधे ,संजय मोरे, गिरीष फेगडे, अरुण सोनवणे, छबिलदास गावंडे, संदेश सोनवणे, कैलास पाटील, राजेंद्र अटवाल, राजेंद्र देवरे व परिसरातील नागरीकांच्या सह्या आहेत.