जळगाव जिल्ह्यातील पोलीस खात्यांमधील ज्या अधिकाऱ्यांचा रेंजमध्ये कालावधी पूर्ण झालेला आहे, अशा 5 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये एका पोलीस निरीक्षकाला एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आलेली आहे.
जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांचा रेंज मधील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आज अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना विभाग डॉक्टर सुखवीर सिंग यांच्या आदेशाने बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांची बदली मुंबई शहर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार, जयवंतराव नाईक, निलेश उखाजी वाघ, पोलीस उपनिरीक्षक घनश्याम चंद्रकांत तांबे, सचिन बाळू नवले, नयन छबूलाल पाटील, यांच्या बदल्या झाल्या आहेत.
तर पांडुरंग विठ्ठल पवार यांना एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची तयारी पूर्ण झाल्याची चर्चा आहे. मात्र, अजूनही कर्मचाऱ्यांची यादी लागली नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणाची बदली कुठे झाली, याची उत्सुकता लागली आहे.