‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा मे महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

0
16

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात मे महिन्याचा १५०० रुपयांचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला आर्थिक पाठबळ मिळत असून, मे महिन्याचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा अनेक लाभार्थी महिला करत होत्या. एप्रिल महिन्याचा हप्ता ७ मे रोजी वितरित करण्यात आला होता.

आदिती तटकरे म्हणाल्या की,आजपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील सर्व पात्र महिलांना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू झाले आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. आतापर्यंत ११ हप्त्यांमध्ये एकूण १६,५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. काहीवेळा दोन महिन्यांचे हप्ते एकत्र वितरित करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे दिला गेला होता.

 

Spread the love