प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ -: तालुक्यातील सुनसगाव येथे दिवसातून दहा वेळा विज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे दररोज दिवसा व रात्री केव्हाही विज पुरवठा खंडीत होतो. सध्या येथील विज वितरण कंपनी च्या कार्यालयात जबाबदार कोणीही अभियंता नाही त्यामुळे तक्रार कोणाकडे करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. वार्ड क्रमांक दोन मध्ये तर स्ट्रिट लाईट नेहमी बंद असते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तरी सतत चा खंडीत होत असलेला विजपुरवठा थांबविण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.