सुनसगाव येथे केंद्रीय समितीची भेट ,केली गावाची पाहणी !

0
21

प्रतिनिधी- जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे स्वच्छता अभियान अंतर्गत केंद्रीय समितीच्या सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी सुनसगाव पेक्षा गोंभी गावाची स्वच्छता व शाळा पाहून पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले मात्र ग्रामपंचायत सदस्यांची उदासीनता यावेळी जाणवली.

येथे केंद्रीय समिती सदस्य पुष्कराज जाणर व भुसावळ तालुका समन्वयक स्वप्नील आदिवाल यांनी भेट देऊन शाळा व अंगणवाडी येथे हात धुण्याची व्यवस्था , आरोग्य उपकेंद्रात पाणी पुरवठा व स्वच्छता समिती कार्यकारणी व बँक पासबूक , एस एल डब्लू एम ची कामे , नाडेफ ,सेग्रिगेशन शेड , सार्वजनिक शौचालय , मंदीर , पाणी तपासणी अहवाल , शौचालय / घरकुल लाभ मिळालेले व लाभ न मिळालेले लाभार्थी यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी समिती सदस्य यांनी गावात ठिकठिकाणी भेट देऊन पाहणी केली मराठी शाळा व अंगणवाडी येथे जाऊन शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधला पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे पासबूक व प्रोसिडींग ची पाहणी केली. तसेच गटारी व कचरा कुंडी व कचरा व्यवस्थापन कसे केले जाते या बाबत माहिती घेतली. त्यानंतर गोंभी गावात जाऊन तेथील पाणी पुरवठा , अंगणवाडी व मराठी शाळा या ठिकाणी भेट दिली. गोंभी येथील मराठी शाळेचे वातावरण व शिस्त पाहून आलेल्या समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले शाळेचा स्वच्छ परिसर मुख्याध्यापक विजय देवरे व शिक्षिका यांनी तयार केलेली सुंदर शाळा तसेच केलेली वृक्ष लागवड आकर्षण ठरले. यावेळी पथकातील सदस्यांचा सत्कार गोंभी शाळेत करण्यात आला.

वास्तविक पाहता काही वर्षापुर्वी सुनसगाव येथे पाहणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात येत होते ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठीत नागरीक एकत्र येत असत तसेच ग्रामपंचायत कार्यालया जवळ रांगोळी ,माहितीचे फलक लावलेले असत काही वेळा तर बँड व दिंडी लावून स्वागत केले जात असे त्यामुळे आलेले पथक हे भारावून जात असे मात्र यावेळी एक दोन पदाधिकारी सोडले असता आमचा काही एक संबंध नसल्याचा प्रत्यय ग्रामपंचायत सदस्य यांनी दाखवून दिला. सरपंच आजारी असल्याने यावेळी उपसरपंच व एक ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी हे पथका सोबत फिरताना दिसले . गावातील ग्रामस्थांना तर काहीच माहित नव्हते त्यामुळे जर गावाची पाहणी करण्यासाठी एखादे पथक किंवा समिती येत असेल तर गावातील पदाधिकारी , शासकिय कर्मचारी , बचतगट ,ग्रामसंघ , उत्साही नागरीक यांना माहिती केल्यास उत्साहाच्या वातावरणात गावाला योग्य बक्षिस मिळाल्या शिवाय राहणार नाही अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे.

Spread the love