कुऱ्हा पानाचे केदारनाथ नगरात पाणी टंचाई ?

0
10

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ -: तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील केदारनाथ नगरातील रहिवाशांना सतत पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते आहे.या भागात पंधरा दिवस होऊनही पाणीपुरवठा वेळेवर केला जात नाही. या बाबत ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सतत वेळोवेळी या भागातील रहिवाशांनी सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी निवेदने देऊनही पाणी मिळत नसल्याने केदारनाथ नगरातील रहिवाशांनी संताप व्यक्त केला असून तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

Spread the love