जळगावला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा प्रस्ताव मान्य

0
18

जळगाव -: जळगावकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे समृद्धी महामार्गाला जळगावला जोडण्याचा प्रस्ताव नागपुरातील बैठकीच्या माध्यमातून चर्चेत आला आहे. त्यामुळे या प्रस्तावास चालना मिळाल्यास आणि तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या म्हणण्यानुसार जळगाव-छत्रपती संभाजीनगरचा प्रवास काही तासांवर आल्यास मुंबईचा प्रवास अवघ्या पाच तासांवर येणार आहे.

त्यामुळे जळगावकरांची मोठी सोय होणार आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

बैठकीला मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावचे प्रतिनिधित्व केले. या बैठकीत जळगावला समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव-छत्रपती संभाजीनगरच्या प्रवासाचे तास कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर, जळगावला समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. त्यातून मुंबई-नागपूरचा प्रवास काही तासांवर येणार आहे. तसेच औट्रम घाटासंदर्भातही गडकरी यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले.

सध्या जळगावहून धुळे-नाशिकमार्गे मुंबई गाठण्यासाठी सुमारे आठ तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. मात्र, छत्रपती संभाजीनगरमार्गे समृद्धी महामार्गाचा वापर केल्यास ही वेळ तीन ते चार तासांनी कमी होणार आहे. त्यामुळे जळगावकरांना अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा मार्ग उपलब्ध होणार आहे. या बैठकीत जळगाव ते समृद्धी महामार्ग जोडणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पास तात्काळ पुढील कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले असून, येत्या काळात प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.

Spread the love