प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या काही शेतकऱ्यांनी शेअर्स ची रक्कम परत मिळावी म्हणून सोसायटी कडे अर्ज केला होता. त्यानुसार सचिव यांनी मासिक सभेत अर्ज सादर केला असता सभेने मंजूरी देऊन प्रकरण संबंधीत बँक निरीक्षक भुसावळ यांच्याकडे पाठवून मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना रक्कम परत करावी असा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार सचिव यांनी प्रकरण बँक निरिक्षक भुसावळ यांच्याकडे सादर केले. मात्र या विषयाला सहाय्यक निबंधक ( ए आर ) भुसावळ यांची परवानगी घ्यावी लागेल त्यामुळे ए आर कार्यालयात प्रकरण द्या असे सांगण्यात आले त्या नुसार चेअरमन व सचिव यांनी प्रकरण दिले मात्र अजूनही मंजूरी मिळाली नाही. मात्र मागणी करणारे शेतकरी दररोज सोसायटी कार्यालयात येत आहेत. वास्तविक पाहता या प्रकरणाशी सहाय्यक निबंधक कार्यालयाचा काहीही संबंध येत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे तरीही बँक निरीक्षक नहाक फेऱ्या मारायला लावत असून शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा अडकून पडला असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून ताबडतोब शेतकऱ्यांना शेअर्सची रक्कम मिळावी अन्यथा हे शेतकरी जिल्हा बँक मुख्य शाखेत जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगीतले आहे तर सोसायटीने शेतकऱ्यांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळावी यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता असून संबंधीत कार्यालयाशी संपर्क साधून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशी सुचना सचिव यांना दिली असल्याचे चेअरमन सुजित पाटील यांनी सांगितले आहे.