सी ई ओ मीनल करणवाल ची कुरेशी बंधूंच्या दादागिरीला लगाम
एस एस सी पास विद्यार्थी व पालकांना एल सी साठी तारीख पे तारीख
जळगाव – : अकरावी प्रवेशाबाबत के एस टी उर्दू शाळेतील ८० विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रक्रियेत समाविष्ट आहे परंतु या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत त्यांच्या जवळ दहावी पास शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहे. २५ जून पासून प्रशासन आश्वासन देत आहे की आज आपणास दाखले मिळतील परंतु २७ तारखेपर्यंत दाखले मिळालेले नाही अशी खंत एकता संघटनेचे फारुक शेख व नशिराबाद ए एम आय चे अध्यक्ष वसिफ सर यांनी खंत व्यक्त केली त्यामुळे दाखल्यांसाठी प्रशासन तारीख व तारीख देत असल्याचे सुद्धा त्यांनी नमूद केले.
शिक्षण अधिकाऱ्यांचे संस्थेच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष
के एस टी उर्दू शाळेच्या व्यवस्थापनाने शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना दिनांक २६ मे २५ रोजी प्रस्ताव देऊन शाळेतील शिक्षक श्री सैयद शाहीद अली यांना तात्पुरता मुख्याध्यापक पदाचा चार्ज देऊन मुलांचे एल सी देण्यास मान्यता द्यावी असा प्रस्ताव दाखल करून सुद्धा शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांनी त्यावर काही एक निर्णय घेतल्या नसल्याने हा वाद समोर आलेला आहे.
आज तरी प्रशासन एकतर्फी चार्ज घेणार का?
शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जळगाव यांना १० जून २५ रोजी के एस टी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा प्रशासकीय चार्ज घेण्याबाबत आदेशित केले असताना सुद्धा २५ जून पर्यंत त्यांनी चार्ज न घेतल्याने एकता संघटनेचे फारुक शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः सी ई ओ मीनल करणवाल यांची भेट घेऊन त्यांना ८० विद्यार्थ्यांच्या एल सी बाबत तक्रार केली असता त्यांनी त्याच अर्जावर स्व हस्ताक्षरात शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना एकतर्फी चार्ज घेणे बाबत आदेशित केले होते.
शालेय व्यवस्थापनाचे असहकार्य
२६ जून रोजी सकाळी गटशिक्षणाधिकारी श्रीमती सरला पाटील, उपशिक्षणाधिकारी रागिनी चव्हाण व मनपा प्रशासकीय शिक्षण मंडळ अधिकारी खलील शेख या तिघी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तत्कालीन मुख्याध्यापक वसीम कुरेशी व चेअरमन शकील कुरेशी या बंधूंनी प्रशासनाला असहकार्य करून चार्ज दिला नाही व कोणतेही सहकार्य न करता दादागिरी केली.
27 जून रोजी सी ई ओ चे गुन्हा दाखल करण्याचे आदेश
शिक्षण अधिकाऱ्यांच्या समितीला न जुमानता कुरेशी बंधूंची दादागिरी सुरू असल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची संपर्क साधून0न माहिती दिली तरीसुद्धा २७ जूनला कुरेशी बंधूंनी प्रशासनाला विरोध दर्शविला एवढेच नव्हे तर स्थानिक पोलिसांनी सुद्धा प्रशासनाला एकतर्फी चार्ज घेण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले नसल्याने एकतर्फी चार्ज घेतला गेला नाही परंतु गटशिक्षण अधिकारी यांच्या तक्रारीनुसार २७ जून रात्री ९.३७ वाजता कुरेशी बंधू वर ” लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बल प्रयोग करणे भारतीय न्याय संहिता कलम १३२, फौजदारी पात्र धाक दपटशा कलम ३५१(१) व दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशाच्या पूर्व सरणार्थ गुन्हेगारी कृती केलेली असल्याने कलम ३(५) अन्वये दोघी कुरेशी बंधूवर अजामीन पात्र गुन्हा दाखल झालेला आहे.”
एफ आय आर मध्ये संघटनेच्या तक्रार अर्जाचा संदर्भ
गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांनी दिलेल्या एफआयआर क्रमांक ११७/२५ दि २७/६/२५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आलेल्या अर्जावर मुख्याधिकारी यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे असे नमूद करून एकतर्फी चार्ज घेण्यासाठी आलो असता कुरेशी बंधूंनी शासकीय कामात अडथळा आणल्याचे नमूद केलेले आहे.
संस्था चालकांनी व पालकांनी बोध घ्यावा
अल्पसंख्यांक समाजातील काही शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक व अध्यक्ष कोणत्याही प्रकारची मोनोपॉली करीत असल्याचे कोणा पालक च्या निदर्शनास आल्यास त्यांनी त्वरित एकता संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेचे समन्वयक फारूक शेख, संघटक मतीन पटेल, अनिस शाह, मौलाना हाफिज रहीम पटेल, मजहर पठाण, नशिराबाद ए एम आय चे वासिफ सर व रईस शेख यांनी एका पत्रकाद्वारे केलेले आहे.