(मुरुमा ऐवजी होतोय मातीचा वापर)
प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: तालुक्यातून जाणारा राज्यमार्ग २७० सुनसगाव पासून भानखेडा बोदवड या रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे मात्र चांगल्या मुरुमा ऐवजी माती मिश्रीत मुरुम टाकला जात असल्याने चिखल होऊन वाहनधारकांचे हाल होत आहेत.
या बाबत माहिती अशी की , सुनसगाव बेलव्हाळ चौबुली पासून गोजोरा गावाकडे रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर सध्या सर्वत्र मातीचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यात गेल्या तीन चार दिवसापासून पावसाची रिपरीप सुरू आहे त्यामुळे गोजोरा – सुनसगाव रस्तख चिखलमय झाला आहे. या रस्त्यावर पायी चालणे तर सोडाच वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून शेतकऱ्यांना बैलगाडी घेऊन जावे लागते मात्र चिखलामुळे बैलांना चालतांना त्रास होतो आहे तसेच मोटरसायकली तर घसरत आहेत . गेल्या तीन दिवसा पासून वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे.मात्र संबंधीत ठेकेदार व अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी तर रस्त्याची चारी काढली नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. माती मिश्रीत मुरुम टाकला जातो आहे तरीही कोणी अधिकारी व पदाधिकारी बोलायला तयार नाही त्यामुळे नाहाक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे, गोंभी रस्त्यावर खड्डे बुजण्यासाठी मातीचा वापर करण्यात आला असल्याने वाहने घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन किमान रस्त्याची एक बाजू चांगली झाल्यावर दुसरी बाजू करावी आणि वाहनधारकांना होणारा त्रास दुर करावा कशी मागणी केली जाते आहे.