यावल -: तालुक्यातीलअमोदा मार्गावरील मोर नदीच्या पुलाजवळ रविवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक खाजगी लक्झरी बस गणेश ट्रॅव्हल्स क्रमांक एमपी.३०.९००९ पलटी होऊन भीषण अपघात घडला. ही बस इंदोरहून भुसावळकडे येत असताना सकाळी सुमारे १५ फूट खोल नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत दोन प्रवासी ठार झाल्याची माहिती असून २५ ते ३० प्रवासी गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बस इंदोरहून भुसावळकडे येत असताना हा अपघात घडला आहे. जखमींना तात्काळ फैजपूर येथील खाचणे रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी त्वरित बचावकार्य सुरू केले, मात्र बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला.