प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात सन २०२५/२६ या शैक्षणिक वर्षातील पालक-शिक्षक संघाची सभा घेण्यात आली. त्या सभेचे अध्यक्ष स्थानी पालक अजय सुभाष राणे हे होते. सभेमध्ये विविध समित्यांची स्थापना करण्यात आली, त्यात शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती ,पालक शिक्षक संघ,विशाखा समिती ,गुणवत्ता विकास संघ, परिवहन समिती ,शालेय पोषण आहार समिती ,माता-पालक संघ, महिला तक्रार निवारण समिती, सखी सावित्री समिती अशा समित्यांची स्थापना करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जे.पी. सपकाळे सर यांनी पालकां सोबत विद्यार्थी हजेरी ,गुणवत्ता, शिष्यवृत्ती अशा अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच पालकांनी मांडलेल्या विविध समस्यांवर चर्चा करून त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
पालक शिक्षक संघाच्या सभेत बहुसंख्यपालक हजर होते. शाळेच्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले अतिशय शांततेत पालक शिक्षक संघाची सभा संपन्न झाली.