प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय येथे “गुरुपौर्णिमा” मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त महर्षी व्यास ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मा.श्री प्रवीण दांडगे यांनी गुरुवंदना या कार्यक्रमानिमित्त मुलांना मार्गदर्शन केले. त्यांनी मानवी जीवनातील गुरूंचे स्थान , त्यांचे महत्त्व वेगवेगळ्या उदाहरणांमधून गोष्टी रुपातून स्पष्ट करून सांगितले.शेवटी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांना वंदन करून कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जे .पी सपकाळे सर, जेष्ठ शिक्षक श्री के.डी तायडे सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.