जळगावच्या न्यायालयात साक्ष सुरू असतानाच आरोपीच्या डोक्यात पडला पंखा !

0
36

जळगावच्या जामनेर न्यायालयात साक्ष सुरू असतानाच आरोपीच्या डोक्यात पंखा पडण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने आरोपी थोडक्यात बचावला आणि त्याला गंभीर दुखापत झालेली नाही.

मात्र या घटनेवरून न्यायालयाच्या इमारतीतील असुविधा आणि डागडुजींचा अभाव इत्यादी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जामनेर न्यायालयात एका खटल्यातील संशयित आरोपी असलेला दिनेश सुरजमल तेली हा कोर्टरूममध्ये पाठीमागे बसलेला होता. न्यायालयात साक्ष घेण्याचे कामकाज सुरू असताना अचानक छताचा फिरता पंखा निखळून आरोपीच्या डोक्यात पडला. या घटनेत सुदैवाने पंखा डोक्याच्या भागाकडून पाठीकडे निसटल्याने अनर्थ टळला असून आरोपीचे सुदैवाने प्राण वाचले. तसेच त्याला मोठी गंभीर दुखापत झाली नाही. या अचानक घडलेल्या घटनेनंतर कोर्टरूम मध्ये एकच गोंधळ उडाला होता.

न्यायालयाची इमारत जीर्ण :

अचानक घडलेल्या या प्रकाराने कोर्टरूम मध्ये एकच गोंधळ उडाला होता. या दरम्यान जीर्ण झालेली इमारत आणि सोयी सुविधांचा अभाव पाहता न्यायालयाची नवीन इमारत बांधली जावी अशी अपेक्षा वकिलांमधून व्यक्त होत आहे. डोक्यात पंखा पडलेल्या आरोपीची प्रकृती आता स्थिर आहे.

 

Spread the love