- लेक लाडकी योजना महाराष्ट्र सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींसाठी राबवली जाते.
- या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंत एकूण ₹१ लाख आर्थिक मदत दिली जाते.
- लाभासाठी अर्ज महिला व बाल विकास विभाग कार्यालयात किंवा ऑनलाइन करता येतो.
- योजनेचा उद्देश स्त्री सक्षमीकरण आणि मुलींचे भविष्य सुरक्षित करणे आहे.
महाराष्ट्र सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबातील मुलींसाठी अनेक योजना राबवत आहे. यातील एक योजना म्हणजे लेक लाडकी योजना. ही योजना म्हणजे स्त्री सक्षमीकरणासाठी उचलण्यात आलेलं एक पाऊल आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण एक लाख रुपयांची मदत केली जाते.
सरकारने माझी कन्या भाग्यश्री योजनेत सुधारणा करून १ एप्रिल २०२३ पासून लेक लाडकी योजना सुरू केली आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे,मुलींचा मृत्यूदर कमी करणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे आणि बाल विवाह रोखण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलीय. योजनेअंतर्गत १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना सरकारकडून टप्प्याटप्प्याने १ लाख १ हजार रुपयांची रक्कम देण्यात येते. चला तर जाणून घेऊ या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? यासाठी पात्रता निकष काय?
योजनेसाठी पात्रता काय आहे?
ही योजना फक्त पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबांसाठी लागू असणार आहे.
मुलीचे पालक महाराष्ट्राचे रहिवासी असावेत.
लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्रातील असले पाहिजे.
तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त नसले पाहिजे.
दिनांक १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.
कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तरी मुलीला लाभ मिळेल.
दुसऱ्या अपत्यासाठी अर्ज करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र द्यावे लागेल.
पहिल्याच्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज देताना हे प्रमाणपत्र द्यावे लागेल.
जर दुसऱ्या वेळेस जुळी मुलं (एक किंवा दोन्ही मुली) झाली तरीही लाभ मिळेल. पण त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आवश्यक असणार आहे.
अर्ज कुठे मिळेल अन् कुठे भरायचा?
या योजनेसाठी अर्ज करणार असाल तर राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, महिला व बालविकास अधिकारी, विभागीय उपायुक्त- महिला व बालविकास कार्यालयातून अर्ज घ्यावा.
मुलीचा जन्म झाल्याची नोंद केल्यानंतर अर्ज सादर करावा. अर्जांची छाननी केल्यानंतर काही कागदपत्रे कमी आहेत. किंवा एखादा अर्ज पूर्ण भरलेला नसल्यास १ महिन्यात त्याची पूर्तता करावी. अर्ज अंगणवाडी सेविकांनी लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यात आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावेत. ते अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका/ मुख्यसेविका यांच्याकडे सादर करावेत.