जळगाव – : वीज कायदा २००३ च्या कलम ५५ नुसार स्मार्ट वीज मीटर लावणे बंधनकारक नाही, असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी सर्व वीज ग्राहकांना कळविले आहे. याची नोंद वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनीही घ्यावी, असे सूचित केले आहे.
वीज मीटर बदलण्यासाठी येणारे ठेकेदार आहेत ती एक नोडल एजन्सी आहे. या नोडल एजन्सीला आपण वीज मीटर लावू नये. असे स्पष्टपणे सांगावे. त्यांनी जर हे अमान्य केले तर त्यांना
हाकलून लावावे. कारण, नोडल एजन्सीला हाकलून लावणे हा सरकारी कामात अडथळा नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही कायद्यानुसार सरकारी कामात अडचण आणणे ही केस आपल्यावर या बाबतीत लागू शकत नाही. स्मार्ट मीटर लावायला आलेल्यांना हे मीटर लावणे आवश्यक असल्याबाबत महाराष्ट्र
सरकारच्या आदेशाची (जीआर) प्रत मागावी. जी ते तुम्हाला देऊच शकत नाहीत, असेही वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे.
हे मीटर लावणे सर्वांनी ताबडतोब बंद करावे. कारण, या मीटरच्या वेगवान फिरल्याने वीज बित भरताभरता आपल्याला अतोनात त्रास होणार आहे. एकदा का जर हे मीटर आपण लावले तर त्याला पुन्हा कोणीही परत काढू शकणार नाही याची सर्वांनी जाणीव ठेवावी, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे.
हे मीटर भविष्यात रिचार्ज सिस्टीमचे होणार आहे. त्यामुळे राज्यात याचा विरोध सुरू असताना तुमच्या घरी येऊन जबरदस्तीने मीटर बसविण्याचे काम वीज वितरण कंपनी करीत.
आहे. जिनियस या कंपनीचे मीटर ज्यांच्या घरी बसविले आहे त्यांना आता दुप्पट बिल येऊ लागले आहे. याकडेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने लक्ष वेधले आहे.
भविष्यातील लूटमार धांबविण्यासाठी जनतेने पाचा तीव्र विरोध आणि तीव्र निषेध करावा. हे मीटर बसविणे अनिवार्य नाही. म्हणून हे मीटर आपल्या घरी बसवून घेऊ नका व खबरदार राहा, असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केले आहे.