एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला; तीन महिला आणि मित्रासह नशेत धुंद

0
42

पुणे -: पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते.

खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी धाड टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, यामध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यातील काही जण उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती आहे. पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाचा समावेश होता, अशी माहिती समोर आली. प्रांजल खेवलकर असे त्यांचे नाव आहे

हे होणारच होतं हे मला माहीत आहे- खडसे

दरम्यान जावई रंगेहाथ सापडताच गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली. गिरीश महाजन जावयाच्या संदर्भात विचारणा केली असता एकनाथ खडसे म्हणाले की, यासंदर्भातील मला माहिती तुमच्याकडूनच पहिल्यांदा भेटत आहे आणि हे होणारच होतं हे मला माहीत आहे. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला. मात्र, यामध्ये राजकीय कारवाईचा वास येत आहे का? अशी विचारणा केली असता खडसे यांनी शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले.

Spread the love