जळगावमधील लाचखोरी थांबेना. ३६ हजाराची लाच घेताना वन अधिकारी, कर्मचारी जाळ्यात

0
50

जळगाव -: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. त्यात बांबू लागवडीची चार प्रकरणे मंजूर करण्याकरिता ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी रंगेहाथ पकडण्यात आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिन्ही संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे (५४), लिपीक निलेश मोतीलाल चांदणे (४५) आणि कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील (२७), अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. तक्रारदार हे शेतकरी असून त्यांना सडावण शिवारात तसेच अन्य तीन नातेवाईकांच्या शेतामध्ये बांबू लागवड करायची होती. त्याअनुषंगाने शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड-वृक्ष लागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी चार प्रकरणे त्यांनी पारोळा सामाजिक वनीकरण विभागाकडे सादर केली होती.

दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी कापुरे यांना भेटुन बांबू लागवडीसाठी दाखल केलेली प्रकरणे मंजूर करण्याची विनंती तक्रारदार शेतकऱ्याने केली. तेव्हा चार प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रूपयांप्रमाणे एकूण ४० हजार रूपये लागतील, असे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदाराने जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

Spread the love