जळगाव -: आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी जीएस ग्राउंड जळगाव येथे शिवाजी दलपत सोनवणे राहणार लाडली तालुका धरणगाव जिल्हा जळगाव यांनी धरणगाव तहसीलदार यांच्या विरोधात अन्नत्याग आमरण उपोषण केले होते.
याबाबत सविस्तर असे कि लाडली येथील शेत जमीन गट नंबर 54 याबाबत कोर्टाचे आदेश असताना देखील ताबा मिळवण्याबाबत तहसीलदारांना अर्ज दिलेला होता. तरी देखील यावर ताबा मिळवण्याबाबत तहसीलदार धरणगाव यांनी गेल्या 33 दिवसांपासून कुठलीही कारवाई न केल्यामुळे न्याय मिळण्यास विलंब होत होता. व टाळाटाळ होत होती. म्हणून लाडली येथील शिवाजी दलपत सोनवणे यांनी जि एस ग्राउंड येथे योग्य त्या परवानगी घेऊन तहसीलदारांविरोधात आमरण अन्नत्याग उपोषण चा पवित्रा घेतला होता.
सदरचे उपोषण चालू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते श्री गुलाबरावजी वाघ साहेब व त्यांचे सहकारी तथा शरद भाऊ तायडे यांनी तहसीलदार धरणगाव यांच्या सोबत बोलणे करून त्यांच्याकडून 19 तारखेला न्याय मिळवून देण्याबाबतचे पत्र प्राप्त करून सदरचे उपोषण स्थगित केले व तहसीलदारांना योग्य तो न्याय निर्णय देण्याबाबत चर्चा केली. आणि त्यानंतर नायब तहसीलदार धरणगाव यांनी उपोषण संपवले