जळगावमधील ‘त्या’ पोलीस निरीक्षकाला निलंबित करा. भाजप आमदाराची मागणी

0
38

जळगाव -: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकताच केला. प्रत्यक्षात, पीडित महिलेने तक्रार न केल्याने संबंधित निरीक्षका विरोधात गुन्हा दाखल झाला नाही.

या पार्श्वभूमीवर, आमदार चव्हाण यांनी मंगळवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पुराव्यांच्या आधारे त्या निरीक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली.

जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या गेल्या शुक्रवारी आयोजित बैठकीदरम्यान चाळीसगावमधील आमदार मंगेश चव्हाण यांनी एका महिलेच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा प्रकार घडल्याकडे लक्ष वेधले. पोलिसांत तक्रार केल्यास सदर महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच आमदारांकडे तक्रार घेऊन गेल्यास त्यांनाही गोळ्या झाडण्याची धमकी संबंधित निरीक्षक देत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. त्यासंदर्भात आपल्याकडे ध्वनीमुद्रीत पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्याच दिवशी पीडित महिला जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधित निरीक्षकाच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पोहोचली होती.

आमदार चव्हाण यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर संबंधित पोलीस निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल होण्याची वेळ आली होती. परंतु, पीडित महिलेने ऐनवेळी विचार बदलल्याने गुन्हा दाखल झाला नाही. महिलेने कोणतीच तक्रार न केल्याने पोलीस निरीक्षकाचे स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार काढण्यावर तेवढे निभावले. पोलीस प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगण्यास कारणीभूत ठरलेल्या कार्यवाही पोलीस अधीक्षकांनी केली.

Spread the love