प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – येथील खडका रोड परिसरात असलेल्या अयान काँलनी येथे पती – पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या माम सासऱ्याचा खून करुन सासऱ्याला जखमी केल्याची घटना दि.१२ रोजी ८:३० वाजेच्या दरम्यान घडली. मयताचे नाव शेख समद शेख इस्माईल ( वय ४० रा.कंडारी भुसावळ ) असून संबंधीत महिलेचे वडील शेख जमील शेख शकुर ( वय ५२ रा.धुळे ) हे जखमी झाले आहेत. संशयीत आरोपी चे नाव सुभान शेख भिकन कुरेशी रा.अयान काँलनी भुसावळ असे आहे. गेल्या काही दिवसा पासून आरोपी सुभान व पत्नी सईदा यांच्यात वाद सुरू होता.त्यामुळे पत्नी दोन दिवस घर सोडून गेल्याने समजविण्यासाठी व वाद मोडण्यासाठी सुभान चे माम सासरे समद शेख व सासरे आले होते. मात्र वाद विकोपाला गेल्याने सुभान शेख याने माम सासऱ्याच्या मान ,पोट व छातीवर चाकूने सपासप वार केले.तसेच सासरे शेख जमील यांच्यावर सुध्दा वार केले.घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. लगेच पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांनी घटनास्थळी पाहणी केली. संशयीत आरोपी सुभान शेख याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.