प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटना जळगाव जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी मिना करणवाल यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की गेल्या ११ महिन्यांपासून मानधन वेळेवर मिळालेले नाही विशेष म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याने त्याची सर्व कामे वेळेवर पार पाडली आहेत.मात्र मानधन रखडल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.