ट्रक अपघातात तरुणाचा मृत्यू , ट्रक चालक फरार, अडावद येथील घटना ..

0
38

चोपडा :: धानोऱ्याकडुन चोपड्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने पायी चालणाऱ्या ३० वर्षीय तरुणास धडक देत चेंगरल्याने तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. महेश पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली.या बाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती अशी की, यावल-चोपडा रस्त्यावरील महेश पेट्रोल पंपासमोर रस्त्याने पायी चालणाऱ्या येथील गुलाब रामकृष्ण राणेराजपूत (वय-३०, रा.अडावद ) यास चोपड्याकडे जाणाऱ्या धरधाव ट्रक क्रमांक आर.जे.२० जी.बी. ६८०१ ने जबर धडक देत चेंगरल्याने गुलाबचा जागीच करुण अंत झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असुन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ट्रकचालक फरार असुन पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. याबाबत अडावद पोलीस ठाण्यात ट्रकचालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किरण दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.शरिफ तडवी हे करित आहे.

Spread the love