प्रतिनिधी- जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील गोजोरा येथे महाकाल मित्र मंडळाने अतिशय सुंदर व जनजाग्रुती करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात छावा नाटीका अव्वल ठरली या नाटीकेत शंभूराजे यांची भूमिका ग्रामस्थांना आवडली. जिल्हा परिषद शाळेच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन महाकाल मित्र मंडळाने आयोजन अध्यक्ष आकाश सोनवणे, उपाध्यक्ष अंकित तळेले , योगेश चौधरी , अशोक दोडे, सुनील तळेले , राजूभाऊ धनगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनी व शालेय समिती अध्यक्ष भागवत कोळी , उपाध्यक्ष जितू दोडे ,शालेय समितीचे सल्लागार उल्हास ढाके , शालेय समितीचे सदस्य धनराज वाघ जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक्ष तसेच शिक्षिका व गावचे सरपंच सौ. नंदा लक्ष्मण कोळी, उपसरपंच चंद्रकांत पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील शिक्षण प्रेमी परशुराम राणे सर , गावातील समाजसेवक लक्ष्मण सपकाळे ,भास्कर डोळे यांनी कार्यक्रमासाठी विशेष अनमोल सहकार्य केले.
विजय भालचंद्र चौधरी , अमोल सरोदे, अमृत पाटील, बंटी दोडे. विलास दोडे ,प्रवीण दोडे. गणेश दोडे ,रवी दोडे ,जनार्धन तळेले, डॉ. प्रसन्न भालेराव,योगेश दोडे, विनोद राणे, कमलाकर कोल्हे, भूषणचौधरी ,हिंदवी मोबाईल शॉपी, जय भोले फटाका मार्ट,माजी पंचायत समिती सभापती मनिषा पाटील,सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती शिवाजी पाटील, शैलेश ठाकरे भुसावळ व समस्त गावकरी यांचे सहकार्य लाभले
कार्यक्रमात प्रथम क्रमांक छावा नाटिका, द्वितीय क्रमांक जि प शाळा इयत्ता पाचवीच्या मुली, तृतीय क्रमांक इयत्ता सातवीच्या मुली यांना मिळाले.
विशेष म्हणजे यावेळी छावा नाटीकेने उपस्थितांची मने जिंकली तसेच मराठी शाळेतील शिक्षकांच्या प्रयत्नातून सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याने व विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम आकर्षक ठरला.