प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील बेलव्हाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेची शालेय व्यवस्थापन समिती पुनर्रगठीत करण्यात आली असून शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षपदी श्री चंद्रशेखर मुकुंदा खाचणे व उपाध्यक्षपदी सौ मीना प्रमोद गोसावी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी सरपंच सौ मनीषा जितेंद्र खाचणे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक श्री किशोर माळी सर, उपशिक्षक श्री रवींद्र पढार सर तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सौ मोनिका अंबिकार उपस्थित होत्या. या प्रसंगी शाळेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन चंद्रकांत खाचणे यांनी दिले. सुरवातीला प्रास्तविक मुख्याध्यापक किशोर माळी यांनी केले त्यात शाळेत शालेय व्यवस्थापन समिती चे महत्व काय असते या बाबत माहिती दिली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शिक्षक रविंद्र पढार यांनी मानले