‘ जळगाव संदेश इफेक्ट ‘
प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची संरक्षण भिंतीला गेल्या वर्ष भरापासून भगदाड पडलेले होते.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत होत्या.मात्र जळगाव संदेश ने वारंवार या बाबत बातम्या प्रसिध्द करुन ग्रामपंचायत प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. आणि जळगाव संदेश बातमीची दखल घेत सरपंच , ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी ताबडतोब निर्णय घेतला आणि भिंतीला पडलेले भगदाड बुजले आहे. यामुळे आता शाळेच्या विद्यार्थ्यांचे लक्ष विचलीत होणार नाही या ठिकाणा येणारी दुर्गंधी येणार नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तसेच जळगाव संदेश चे आभार मानले आहे.