राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भुसावळ तालुकाध्यक्षपदी विलास पाटील वराडसिमकर यांची वर्णी !

0
26

प्रतिनिधी -जितेंद्र काटे

भुसावळ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( अजित पवार गट ) च्या भुसावळ तालुका अध्यक्षपदी वराडसिम येथील माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विलास रामदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील व रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या हस्ते विलास पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पक्षाचे युवक अध्यक्ष अतुल चव्हाण व शहर कार्याध्यक्ष निलेश कोलते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वराडसिम पंचक्रोशीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाचे बळकटीकरण व प्रचार तसेच पक्षासाठी काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते तयार करणार असल्याचे नवनिर्वाचित भुसावळ तालुकाध्यक्ष विलास पाटील यांनी सांगितले.

Spread the love