भुसावळ -: प्रतिनिधी जितेंद्र काटे (JSN)काही महिन्या पासून या परिसरात वारंवार विज पुरवठा खंडित होणे तसेच कमी अधिक दाबाने विजपुरवठा करणे असे प्रकार होत असल्याने परिसरातील जनता त्रस्त झाली आहे त्यात भर म्हणजे या परिसरातील व्यावसायीकांना औद्योगिक वसाहत म्हणून नियमीत विज पुरवठा केला जातो परंतु त्यात उच्चदाबाने विजपुरवठा केल्याने येथील शक्ती पेपर मील चे रोहित्र जळाले त्यामुळे मील बंद ठेवून लाखोंचे नुकसान सहन करावे लागले आहे.
या बाबत माहिती अशी की , शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे ४ वाजे पर्यंत पेपरमील कंपन्यांचा विज पुरवठा खंडीत होता आणि ९ रोजी सकाळी ११ वाजता अचानक ५०० व्होल्ट चा विजपुरवठा करण्यात आला त्यामुळे शक्ती पेपर मीलचे रोहित्र जळाले. विशेष म्हणजे कंपनी संचालक यांनी उच्चदाबाचा पुरवठा होताच चोरवड सब स्टेशन च्या परिचालकांशी संपर्क साधला मात्र तरीही विज पुरवठा कमी करण्यात आला नाही.
या परिसरात सतत विज वितरण कंपनी कडून विज खंडीत होत असते त्यामुळे या उद्योजकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार खंडीत विज पुरवठ्यामुळे पेपर मील मालक वैतागले असून या बाबत संबंधीत वरीष्ठ अधिकाऱ्यांना कळवून सुध्दा फायदा होत नसल्याने संबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जाते आहे.
सुनसगाव येथे विज वितरण कंपनी चे कनिष्ठ अभियंता कार्यालय आहे.मात्र काही महिन्यापासून कायम स्वरुपी अभियंता नाही. लाईनमन आणि वायरमन मंडळींवर हे कार्यालय अवलंबून आहे त्यामुळे कायमस्वरुपी विज अभियंता मिळावा अशी मागणी होत आहे.












