गोजोरा शाळेत विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !

0
38

प्रतिनिधी जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील गोजोरा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत चैतन्य आयुर्वेदिक हॉस्पिटल भुसावळ (साकेगाव) तर्फे शालेय विद्यार्थ्यांचे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बालरक्षा किट मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. प्रसन्न भालेराव , डॉ. मनीष ईश्वरकर तसेच सहयोगी डॉ. .तेजस कोळपे , आदिती बोरसे , तेजस्विनी पाटील , विशाखा खिरवाडकर, आरोग्यसेविका हर्षा खरे , गोजोरे गावातील माजी सैनिक व सरपंच पती लक्ष्मण दादा सपकाळे , शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष भागवत भाऊ कोळी, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष धनराज भाऊ वाघ, शालेय व्यवस्थापन समिती शिक्षणप्रेमी उल्हास भाऊ ढाके, मुख्याध्यापक श्री बावस्कर सर , कोळी सर , क्रांती मॅडम तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते याप्रसंगी सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रम प्रसंगी डॉ.प्रसन्न भालेराव , लक्ष्मण सपकाळे व धनराज भाऊ वाघ यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन व आभार कोळी सर यांनी मानले.

Spread the love