जळगाव :- भारतात अस्पृश्यता हजारो वर्षांपासून चालत आलेली एक अनिष्ट प्रथा होती , त्यामुळे या अस्पृश्य समाजास जनावरा पेक्षा हिणकस जिणं जगावे लागत होते तेंव्हा ती अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून अनेक संत , महात्मे , महापुरुषांनी प्रयत्न केले पण ती नष्ट होऊ शकली नाही मात्र बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून तिला एका वाक्याने नष्ट करून टाकली, त्या मुळे आज पूर्वाश्रमीचे अनेक अस्पृश्य मोठ – मोठ्या हुद्द्यावर विराजमान असून उच्य जातीची माणसं त्यांच्या हाताखाली काम करीत आहेत असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
अजिंठा हाउसिंग सोसायटी येथील जेतवन बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाषण करताना ते बोलत होते. जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात जात , धर्म , संस्कृती , वंश, भाषा अश्या बाबी वरून कधीच कोणाला कमी लेखले नाही तसेच कोणाला श्रेष्ठ मानले नाही . माणूस हाच एकमेव धर्म मानून मानवाचे कल्याण हेच त्यांनी केंद्रस्थानी मानले .
केंद्रीय शिक्षिका ज्योती भालेराव यांनी सांगितले की , बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आपल्यावर मोठे उपकार केलेले आहेत , आपल्याला स्वाभिमान , माणूसपण त्यांनी बहाल केले आहे . आपल्या देशात बुद्ध , महात्मा फुले , शाहू महाराज , बाबासाहेब यांनी महिलांना सन्मान प्रदान केला तेंव्हा या महापुरुषांच्या विचारांचा वारसा महिलांनी पुढं न्यावा .
कार्यक्रमाच्या आधी सोसायटी मधून कँडल मार्च काढण्यात आला , त्या नंतर बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले , सामूहिक त्री सरण, पंचशील ग्रहण करून मान्यवरांचे भाषणं झाली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. आनंद कोचुरे होते त्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले . सूत्रसंचालन चेअरमन दिलीप सपकाळे , प्रास्ताविक सचिव निलेश सैंदाणे , परिचय कविता सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन सुनंदा वाघ यांनी केले .
कैलास भालेराव , प्रवीण नन्नवरे , विजया शेजवळे , रजनी बडगे , ममता सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय भालेराव , रवींद्र सैंदाणे , नितीन वाघ , संजय सपकाळे , पूजा कोचुरे , आशा सपकाळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास माया भालेराव , वर्षा कोचुरे , प्रज्ञा सैंदाणे , वर्षा कोचुरे , पूनम वानखेडे , सीमा सैंदाणे , विजय सैंदाणे , प्रियंका सपकाळे , आदिती भालेराव , मनीषा भालेराव , निता शीरसाळे, सिंधू तायडे , कल्पना नन्नवरे , सुमन बैसाने , सुमन सोनवणे , नूतन तासखेडकर , ज्योती गजरे , दीक्षा गजरे , मीना बिऱ्हाडे , संगीता सैंदाणे , जमुनाबई साबळे आदी मोठ्या संख्येने हजर होते.












