उषा इंटरनॅशनल, दिल्ली व कस्तुरबा ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सॅटेलाइट शिलाई स्कूल शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

0
28

प्रतिनिधी -जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे दि. ८/१२/२०२५ रोजी उषा इंटरनॅशनल, व कस्तुरबा ट्रस्ट पुणे यांच्या सहकार्याने आणि कस्तुरबा नॅशनल मेमोरियल ट्रस्ट सासवड यांच्या वतीने सेटेलाइट शिलाई स्कूल शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. सेटेलाइट प्रशिक्षणा अंतर्गत भुसावळ तालुक्यातील 30 महिलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य सौ. शशिकला ताई बडगुजर होत्या

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे रा. धो. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाऊ पाटील, उषा कंपनीच्या ट्रेनर वर्षाताई मते, उषा कंपनीचे मेकॅनिकल कमलेश भाऊ होते.

सर्वप्रथम मा जिजाऊ व सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी आलेल्या महिलांचे स्वागत करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. रा.धो माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी चौधरीसर यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम असून महिलांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या स्वतःच्या पायावर त्यांनी उभे राहावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

उषा कंपनीचे ट्रेनर वर्षाताई मते यांनी महिलांनी स्वावलंबी व्हावे व चुल व मुल याच्या पलीकडे विचार करावा. आपण या ठिकाणी आलेले आहे. आपण शिलाई संबंधी सर्व गोष्टी शिकून घ्याव्या व आपल्या पायावर उभे राहावे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर बडगुजर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कस्तुरबा ट्रस्ट व उषा इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार निर्मिती कशी होईल याची माहिती सांगितली एक वर्षांपूर्वी ज्या महिला शिलाई शिकून गेल्या त्यांनी ज्या महिलांना शिकवले अशा महिलांसाठी हे ट्रेनिंग असून आपण शिलाई प्रशिक्षण पूर्ण करावे. गांधीजींनी म्हटले होते खेड्याकडे चला परंतु आज खेड्यामध्ये रोजगार निर्मित होत नसल्याने बरेचसे लोक शहराकडे जात आहे. म्हणून आपण या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे ही मनोकामना व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भाऊ उंबरकर यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रा.धो. माध्यमिक विद्यालयाचे छबाई सभागृह माननीय एकनाथ बडगुजर यांनी उपलब्ध करून दिले. त्यांचे मनापासून आभार.

या कार्यक्रमाला पोलीस पाटील गोंभी वैशालीताई पाटील, माधुरीताई कंखरे सुनसगाव, ग्रा.पं. सदस्य कुऱ्हे पानाचे शारदा ताई महाजन, आरतीताई भिल्ल मिरगव्हान, विद्याताई पाटील जोगलखोरी यांचे सहकार्य लाभले.

Spread the love