प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: तालुक्यातील सुनसगाव येथील एका दांम्पत्याला विटांचे ट्रँक्टर आल्याचे सांगत दिवसाढवळ्या भर वस्तीत ५० हजाराला गंडविल्याची घटना घडली असून अज्ञात फसवेगीरी करणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला पोलीसात तक्रार करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.
या बाबत माहिती अशी की येथील गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सुपडू बोराळे ( वय ४५ धंदा – मजूरी ) व पल्लवी बोराळे ( वय ४० धंदा – आंगणवाडी सेविका ) हे कुटूंब आपल्या परिवारासह राहत असून दि.१२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता एक इसम मोटरसायकलीने घराजवळ आला व भाऊ ,घरी आहेत का विटांचे ट्रँक्टर आले आहे रस्ता दाखवायला चला असे सांगीतले .त्यामुळे सुपडू बोराळे हे बाहेर आले व त्या इसमाच्या मोटरसायकल वर बसले असता मोटरसायकल स्वार त्यांना गोंभी फाटा येथे घेऊन गेला व तिथे असलेल्या केळी वेफर्स च्या दुकानावर बसविले आणि तुमच्या घरुन विटांचे पैसे आणतो असे सांगून मोटरसायकल घेऊन घर गाठले.यावेळी पल्लवी बोराळे भाजीपाला निवडत असताना संबंधीत इसमाने विटांचे पैसे द्या अशी मागणी केली. त्यावेळी पल्लवी बोराळे यांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून सीआयएफ कर्जाचे ६० हजार रुपये कर्ज काढलेले होते व ती कर्जाची रक्कम ज्या कपाटात ठेवलेली होती ते कपाट उघडून ५० हजार रुपये असलेली थैली बाहेर काढली व १० हजार रुपये देऊ लागली.त्याच वेळी त्या इसमाने फोन वर बोलण्याचे नाटक करुन १० नाही ५० आणतो असे सांगीतले व ५० हजार रुपये घेऊन लगेच निघून गेला. थोड्या वेळाने सुपडू बोराळे घरी आल्यावर हा प्रकार समोर आला व आपण त्या माणसाला ओळखत नसल्याचे सांगितले.सदरचा अनोळखी इसम घटनास्थळी शेजारी असलेल्या कृषी केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून नंबर प्लेट नसलेली होंडा शाईन मोटरसायकल असल्याचे दिसते.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संध्याकाळी भुसावळ तालुका पोलीसात तक्रारी अर्ज दाखल केला असून पो.नि. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ धिरज मंडलिक तपास करीत आहेत. या प्रकारा बाबत परिसरातील व रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून लवकरात लवकर संबंधीत भामटेगीरी करणाऱ्यास जेरबंद करणार असल्याचे पोलीसांनी सांगीतले आहे.
सध्या अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असून नागरीकांनी सतर्क राहावे तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडून दागिने ,रोखरक्कमा काढून देऊ नये.तसेच असा संशयास्पद प्रकार पाहायला मिळाल्यास पोलीसांशी संपर्क साधावा. महेश गायकवाड पोलीस निरीक्षक तालुका पो.स्ट.भुसावळ












