लाडक्या बहिणी नेमक्या कुणाच्या भाजप की शिंदे शिवसेना या अजीत पवार राष्ट्रवादीच्या

0
26

निवडणूकीचा एक टप्पा संपला असला तरी या निवडणुकच्या प्रचार सभेत भाजप, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गट हे जे ते म्हणाले लाडकी बहिण हि योजना आम्हीच सुरू केली म्हणून सांगत सुटले, तरी लाडक्या बहिणी नेमक्या कुणाच्या यांचा उलगडा होत नसल्याने लाडक्या बहिणी ही संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहेत.

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचा एक टप्पा संपला असला तरी सरकार मधील युतीचे घटक पक्ष या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या. निवडणुका लढवत असताना तिन्ही सत्ताधारी पक्ष लाडक्या बहिणीची योजना आम्हीच सुरू केली म्हणून भाषणे ठोकताना दिसून आले.

पण लाडक्या बहिणीला मात्र प्रश्न पडला की,मत कोणाला द्यावं याच संभ्रमावस्थेत होते.त्यामुळे सर्व सामान्य माणसाला सुध्दा नेमक्या लाडक्या बहिणी कोणाच्या हेच कळेणासे झाले.पण लाडक्या बहिणी ही हुषार भाऊ तर तिघ ही ,पण या निवडणुकीत जो जादा माल मोजेल त्यालाच मतांचे दान असे बहिणीचे ठरले.असे दिसते.तिघांच्या सभेला बहिणीचाच गल्ला पण अखेर खुर्द्याकडेच पळाल्याचे दिसते. आपल्या एक विरोधी पक्ष खंबीर असावा जेणेकरून लोकशाही मध्ये राज्यकर्तेना मनमानी कारभार करता येणार नाही.पण पैशामुळे लोकशाहीची थट्टाच केली जात आहे.

आणी मतदार ही त्या पैशांच्या अमिशाला बळी पडत आहेत.या पैशाच्या खेळांमध्ये चांगले व होतकरू नेतृत्व बाजुला सारला जात आहे.अन धनधांडगेच मैदानात शड्डु टाकुन उभे राहत आहेत.हे भविष्यातील राजकियासाठी धोक्याची घंटा आहे.काही पक्ष सत्तेत बसण्यासाठी फुकटची योजना जाहीर करत राज्याच्या तिजोरीवर ताण पाडत आहेत.लाडक्या बहिणीला १५०० हजार रुपयाच आमीष दाखवुन मते घेऊन सत्तेत बसायचं हे अनाकलनीय आहे.त.याऐवजी महिलांना रोजगार सुरू करुन ते मिळवुन दिले असते तर एकीकडे महिलांना ते पैसे मिळण्याऐवजी काम करुन मिळाले असते व तिजोरी वरही भार पडला नसता पण तसे होत नाही.असो राज्यातील लाडक्या बहिणीचा कल १५०० रुपये देऊन ही लाडका भाऊ ठरवता आला नाही.शेवटी त्या मतांसाठी जो दाम जास्त देईल तोच भाऊ ठरलेला दिसतो.

Spread the love