हरिविठल वासियाचे ठरले ! स्थानीक नगरसेवका साठी नवा चेहरा समोर

0
34

जळगाव -: महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होऊन जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या निवडणुका होतील. त्याकरिता महापालिका निवडणुकीच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातच जळगाव मनपाच्या हरिविठ्ठल येथील प्रभाग क्रमांक 11 अ मधुन आपल्या हक्काचा माणुस निवडून देण्यासाठी येथील नागरीकांनी निश्चय केला आहे.

स्थानीक असलेला नवा चेहरा कोण

हरिविठ्ठल प्रभाग क्रमांक 11/ अ मध्ये सुमारे 30 वर्षापासून राहात असलेल्या अरुणा सुहास कोळी साधी राहणीमान व घराघरात ओळखीचा चेहरा असलेल्या तसेच स्थानिक असल्याने प्रभागामधील अडीअडचणींची जाणिव असलेल्या तसेच मागील 25 वर्ष पासून किराणा दुकान चालवत असल्याने प्रभागात अरुणा कोळींचा मोठा जण संपर्क आहे. हरिविठ्ठल प्रभाग क्रमांक 11 अ मधिल रहिवाशांच्या प्रतिक्रीया जाणुन घेतल्या असता आतापर्यंत जे काही नगरसेवक निवडून आले त्यात निवडून आलेले नगरसेवक स्थानिक नसल्यामुळे प्रभागामधिल नागरीक बऱ्याच वर्षापासून विकासापासून वंचित राहिले आहे.प्रभागामधील नागरिकांनी समस्या सांगाव्यात तर कोणाकडे असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला असतो. त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 अ येथील स्थानिक असलेल्या रहिवाशी अरुणा सुहास कोळी यांनाच निवडून देण्याचा निर्धार येथील नागरीकांनी केल्याचे देखील सांगण्यात आले.

Spread the love