जळगाव :- बुद्ध चतु परिसा भिक्खूनी संघ , थायलंड द्वारा भारतात महिलांमध्ये बौद्ध परंपरा विषयी प्रबोधन करणे, अधिकाधिक महिलांना भिक्खूनी बनविणे, भिक्खूनी निवासकेंद्रं उभारणे अश्या विविध उपक्रमास गतिमान करण्या करिता सातत्याने प्रयत्न केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी थायलंड येथील भिक्खूनी विसुती याना यांच्या नेतृत्वाखाली १२० बौद्ध भिक्खुनी जळगाव येथे येत आहेत . अशी माहिती जळगाव येथील भिक्खूनी अय्या वेदिसा यांनी दिली.
अजिंठा हौसिंग सोसायटी येथील जेतवन बुद्ध विहारात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या बैठकीत अधिक माहिती संघमित्रा चव्हाण यांनी देतांना सांगितले की थायलंड येथील ९ भिक्खूनी त्यांच्या भारतीय सहकारीनिंसह जळगाव येथे येणार आहेत. त्या सर्वप्रथम अजिंठा सोसायटीत चारिका करणार व त्यानंतर उपस्थित जनतेस धम्मदेसना देतील.
कार्यक्रमाची आखणी उपासक चेतन नन्नवरे यांनी मांडली व या समारंभात जळगाव शहरातील बौद्ध महिलांना अधिक संख्येने सहभागी करून घेण्या करिता करावयाच्या कामांची माहिती सांगितली. जेष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी सांगितले की, येवढ्या मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खूनी जळगाव शहरात येणे ही एक ऐतिहासिक बाब आहे . बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ स्वतंत्र भिक्खूनी संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करीत आहे ही महिलांच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने गौरवास्पद आहे.
कार्यक्रमाच्या नियोजना करिता ॲड. आनंद कोचुरे, दिलिप सपकाळे , प्रियंका सपकाळे, गीता सोनवणे, ज्योती भालेराव यांनी विविध प्रकारच्या सूचना करून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश सैंदाणे, प्रास्ताविक नूतन तासाखेडकर , परिचय कविता सपकाळे यांनी तर आभारप्रदर्शन हर्षल सुरडकर यांनी केले .
बैठकीस प्रवीण नन्नवरे , दिलिप तासखेडकर, सतीश सोनवणे, विजय भालेराव, विजय सैंदाणे, रामकृष्ण सावळे , वर्षा कोचुरे , आशा सपकाळे , सुनंदा सैंदाणे, सुमन बैसाने , विमल भालेराव , पूजा कोचुरे , रंजनी सैंदाणे आदींसह स्त्री , पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.











