गड – किल्ले बनवा स्पर्धेत सुनसगाव विद्यालयाचा व्दितीय क्रमांक .

0
17

प्रतिनिधी -जितेंद्र काटे 

भुसावळ – जळगाव येथे रोटरी वेस्ट तर्फे गड – किल्ले बनवा या स्पर्धेचे आयोजन मायादेवी नगरातील रोटरी भवनात नुकत्याच स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांचा निकाल नुकताच लागला असून या स्पर्धेत सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयातील पुर्वा महेश कोळी , प्रेरणा कमलाकर कोळी , आर्यन नरेश सपकाळे , टिनेश महेश कोळी , निखील किशोर चिंचोरे या विद्यार्थ्यांनी खुल्या गटात सहभाग नोंदवला होता.विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती.

याठिकाणी गड किल्ले पाहण्यासाठी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या स्पर्धेत दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खुल्या गटात व्दितीय क्रमांक पटकावला असून या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे महेश कोळी यांनी सांगितले आहे. या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक जे पी सपकाळे यांनी सांगितले आहे.

Spread the love