सुनसगाव विद्यालयात सहकार महर्षी दामू पांडू पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण !

0
16

प्रतिनिधी  – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात सहकार महर्षी कै. दामू पांडू पाटील यांच्या ४ जानेवारी रोजी स्मृतिदिनानिमित्त पुतळ्याचे अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त करताना कै. दामू दादांनी गावासाठी, समाजासाठी अहोरात्र मेहनत घेऊन एक सामाजिक आदर्श निर्माण केला. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभ सारखे आहे त्यांची अजरामर स्मृती रहावी म्हणून संस्थेने त्यांचा पुतळा बसवला तो पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन हरी पांडू पाटील होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कै. दामू दादांच्या स्मृतिदीना निमित्त शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व खेळाच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीन क्रमांकांना व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाला संस्थेचे चेअरमन आर.डी. पाटील सर यांनी स्वखर्चाने बक्षीस देणे ते जाहीर केलेले आहे. ही बक्षीसे सर्व पाहुण्यांच्या हस्ते बक्षीचे देण्यात आली.

यावेळी कै. दामू दादांच्या पुतळ्याचं अनावरण माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषदेत माजी अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यापुढे बोलताना म्हणाले माझे वडील कै.प्रल्हादराव पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून कै. दामू दादा पाटील यांनी पंचक्रोशीत पायी फिरून, अखंड परिश्रम घेऊन विकासाचं काम केलं तसेच माझे वडील व कै. दामू दादा पाटील या दोघांची जोडी राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखली जायची. दादांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर विविध संस्थांमध्ये एक वेगळा ठसा निर्माण केलेला होता. गावातील मूलभूत सोयी सुविधा दादांनीच निर्माण केलेल्या आहेत. वाघुर नदीवर अगोदर पूल नव्हता त्यावेळेला दादांनी मनुर ला येऊन आमचे मेहुणे चिफ इंजिनियर होते त्यांना गाडीने या भागातून घेऊन आले आणि त्यांच्याकडून पूल बनवण्यासाठी,मंजूर करण्यासाठी विशेष पाठपुरावा केलेला आहे. दादांनी माझ्या बालपणी जे संस्कार केले त्यामुळे मी घडलो आणि कैलासवासी दामू दादांच्या प्रयत्नामुळेच मी जिल्हा परिषदे मध्ये निवडून आलो व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो. माझ्या हातून दादांच्या पुतळ्याचे अनावरण होणे हे मी माझे भाग्य समजतो.

यावेळी शाळेची ज्येष्ठ शिक्षक कैलास तायडे यांनीही दादांनी विविध संस्थांच्या पदांवर काम केल्याचा आलेखच मांडला.

यावेळी कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन श्री आर. डी. पाटील,संस्थेचे सेक्रेटरी सुहास पाटील, संस्थेचे सदस्य चंद्रकांत भोळे, डिगंबर पाटील, उल्हास भोळे, सुजित पाटील,गणेश पाटील, दिलीप पाटील, श्रीधर खाचणे, भादली हायस्कूलचे माजी चेअरमन जी. एम.महाजन, माजी पंचायत समिती सदस्य नाना पाटील डी. पी. वारके, चंद्रकांत बोंडे, अशोक पाटील, सुधाकर पाटील,, राकेश पाटील,, प्रा. ज्ञानदेव जंगले तसेच कैलासवासी दामू पांडू पाटील यांची मुले, मुली, जावई, सुना व नातवंडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे पी सपकाळे यांनी केले, सूत्रसंचालन हर्षाली गाढे यांनी केले व आभार पी एन बागुल यांनी मानले.

Spread the love