वराडसिम वाघुर धरणाकडे जाणारा रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात ?

0
7

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – येथून जवळच असलेल्या वराडसिम वाघुर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली असून या रस्त्याने वाहनधारकांना तसेच शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

वराडसिम प्राथमिक आरोग्य केंद्रा पासून वाघुर धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची या काटेरी बाभूळ व झुडपांमुळे वाहन चालवताना या झाडांचे फटवराडसिम वाघुर धरणाकडे जाणारा रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात ?के लागतात तसेच जर या मार्गावर समोरा समोर दोन वाहने आली तर या काटेरी झुडपांचा मोठा त्रास होतो. या रस्त्या बाबत अधिकाऱ्यांना सांगीतले तर वेगवेगळी कारणे सांगीतले जातात.तर कधी कधी ही आमची हद्द नाही असे सांगीतले जाते. वराडसिम गावा कडून जातांना कंडारी मार्गे हा रस्ता उमाळा गावाजवळ जळगाव – छत्रपती संभाजी नगर मार्गाला मिळतो तर अनेक कामगार याच रस्त्याने नोकरी निमित्त ये जा करीत असतात.

काटेरी झुडपे वाढल्याने रात्रीच्या वेळी समोर काहीच दिसत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे वाघुर प्रकल्पाचे अधिकारी याच मार्गाने ये जा करीत असतात परंतु संबंधीत अधिकारी का बोलत नाही ? असा प्रश्न विचारला जात असून लवकरात लवकर या रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यात येऊन रस्ता मोकळा करावा अशी या रस्त्यावरुन नियमीत ये जा करणाऱ्या कामगार व वाहनधारकांनी केली असून या काटेरी झुडपांमुळे अपघात घडला तर सर्व जबाबदारी रस्त्याशी संबंधीत अधिकाऱ्यांची राहील असे या परिसरात सांगीतले जाते आहे.

Spread the love