प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ -: मानवाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सांगेश कुमार भाटीया यांनी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक श्री सुधिर सुकलाल पाटील यांनी केलेल्या सर्व चांगल्या कामा बाबत पदोन्नती करुन भारत संघटन मंत्री म्हणून बढती केली आहे. विशेष म्हणजे सुधीर पाटील सरांचे कार्य जळगाव जिल्ह्यात महान आहे.आडले नडले यांच्या सर्व कामांसाठी सुधीर पाटील हे सेवा देतात असे त्यांच्या निकटवर्तीय मंडळींनी सांगीतले असून सर्व स्तरातून सुधिर पाटील यांचे अभिनंदन केले जाते आहे.












