प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – हिंद दि चादर “श्री गुरु तेज बहादुर साहिब जी ३५० वा शहिद समागम आरोग्य पंधरवाडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत दिनांक 25/02/2026 रोजी प्रा. आ. केंद्र वराडसिम अंतर्गत उपकेंद्र सुनसगाव येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर सर यांच्या आदेशान्वये व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तडवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर राबवण्यात आले. शिबिरात गरोदर माता बालकाची या सर्वांचे आरोग्य तपासणी करण्यात आले ,0 ते 5 वर्ष बालकांचे आरोग्य तपासणी ,गरोदर मातांना आयर्न फॉलिक ऍसिडच्या गोळ्या , जिल्हा परिषद शाळा मुलांना आरोग्य तपासणी तसेच हात धुण्याच्या पद्धती, वैयक्तिक स्वच्छते बद्दल मार्गदर्शन करण्यात आले, व, उपकेंद्रातील , परिसर स्वच्छता करण्यात आली, लसीकरणाबद्दल माहिती देण्यात आली व महिलांची आरोग्य तपासणी व रक्त तपासणी व गरोदरपणात घ्यावयाची काळजी व बालकांची घ्यावयाची काळजी व स्तनपान विषयी माहिती, तसेच पॅरेटिव्ह केअर गृहभेटी तपासणी मार्गदर्शन करण्यात आले प्रसंगी वैद्यकीय अधिकारी
डॉ. पंकज सैनी सर व डॉ.फालक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सीएचओ डॉ रुपेश पाटील, आरोग्य सेवक संजय कोळी, आरोग्य सेविका विजया पाटील, आशा सेविका ज्योती पाटील, सुनिता काटे , शारदा इंगळे बेलव्हाळ , प्रतिभा पाटील गोंभी तसेच ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा तायडे , अंगणवाडी सेविका चारुशीला बेंडाळे , संगीता धनगर ,पल्लवी बाविस्कर , मदतनीस शोभा चौधरी, आशा चौधरी , मोहीनी पाटील व लाभार्थी कार्यक्रमास उपस्थित होते











