सुनसगाव स्मशानभूमीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम कोणाच्या आशिर्वादाने सुरू ?

0
5

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील स्मशानभूमीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असताना उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी काही दिवसांपूर्वी काम बंद केले होते मात्र दि.२८ रोजी पुन्हा काम सुरू करुन घाईघाईने काम उरकून घेतले जात असताना उपसरपंच एकनाथ सपकाळे व गावातील काही सुज्ञ नागरिक स्मशानभूमीत जाऊन निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरू असल्याने काम बंद पाडले तसेच ओटा बांधकाम चक्क विटावर विटा रचून तयार केले जात होते हे काम नागरीकांनी खोदायला लावले व जो पर्यंत कामाचे इस्टीमेंट दाखवले जात नाही तो पर्यंत बांधकाम करु नये असे सांगितले.विशेष म्हणजे या कामाचा ठेकेदार कोण ? तसेच एवढे दहा लाख रुपयांचे काम कोणाच्या आशिर्वादाने बोगस होते आहे हे जनतेसमोर येणार नाही तो पर्यंत गप्प बसणार नाही असे एकनाथ सपकाळे यांनी सांगितले आहे.विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयातील एकही सदस्य या प्रकरणात बोलत नसल्याने नेमका प्रकार काय ? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. वास्तविक पाहता सर्व पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशी चर्चा सुरू असून गावातील ग्रामपंचायतीचे इतर सर्व बांधकाम कामे गावातील ठेकेदाराला दिली जातात मग हे काम बाहेर कसे दिले त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी उपसरपंच एकनाथ सपकाळे यांनी केली आहे.

Spread the love