गोजोरा येथे मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू !

0
4

प्रतिनिधी -जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोजोरा येथे ग्रामपंचायत कार्यालय व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत गावातील मुलींनी येऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून शासकीय नोकरीत लागून गोजोरा गावाचा गौरव व्हावा ही अपेक्षा सरपंच पती व माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी यांचा मानस आहे. गोजोरा गावात या आधी मुलांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे त्यामुळे अनेक युवक नोकरीत भरती झाले आहेत.या अभ्यासिकेचे उद्घाटन नुकतेच पुंडलिक दादा तळेले, बबन शेलार , भालचंद्र पाटील ( मुंबई ) व सरपंच नंदा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते शालिक पाटील, रामदास दोडे, अनिल पाटील, विनोद शिंदे, भागवत कोळी, भुरा थोडे, वासुदेव चौधरी, दिपक ढाके, नथ्थू थोडे, उपसरपंच चंद्रकांत पाटील, सदस्य तानाजी पाटील, भास्कर थोडे, रविंद्र थोडे, विशाल सोनवणे यांची उपस्थिती होती प्रसंगी सीआरपी राणी सोनटक्के, इंदूबाई वारके, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.सुत्रसंचलन धनराज वाघ यांनी तर आभार माजी सैनिक लक्ष्मण कोळी यांनी मानले.विशेष म्हणजे मुलांच्या अभ्यासिकेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Spread the love