प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील गोजोरा येथे सालाबादप्रमाणे यंदाही ८ मार्च रोजी श्री मरीमाता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने शांताराम दोडे,जिवन जावळे, घनश्याम कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली भगत आत्माराम बाबा दोडे हे बारा गाड्या ओढणार असून त्यांना भुरा सपकाळे व सोपान कोळी हे बगले राहणार आहेत. यात्रेनिमित्त श्री मरीमाता मंदीरात रंगरंगोटी करण्यात आली असून या यात्रेत खेळणी,पाळणे, मिठाई व सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी येणार आहेत. यात्रेनिमित्त क्रांती सोनवणे डोणगावकर यांच्या लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त शिलीक दोडे , डिगंबर पाटील, तुषार सपकाळे, संतोष कोळी, संतोष पाटील,भुषण दोडे तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासोचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच गावातील सर्व ग्रामस्थ तसेच तरुण मित्र मंडळ सहकार्य करीत आहेत . विशेष म्हणजे गावाची यात्रा वर्षातून एकदा येते त्यामुळे बाहेर गावाहून नोकरी निमित्त गेलेले नागरीक गावी येतात त्यामुळे यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन पोलीस पाटील विनोद सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी यांनी केले आहे.यात्रे निमित्त भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे औट पोष्टचे पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.










