प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ जिल्हा परिषदेच्या शाळेत ‘कलाविष्कार’ हे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विविध लोकनृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. यात वैयक्तिक आणि सामूहिक नृत्य, गायन, नाटिका सादरीकरण इ. कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरपंच सौ मनिषा जितेंद्र खाचणे यांनी दीपप्रज्वलन करून केली. यावेळी व्यासपीठावर सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्य, गावचे पोलीस पाटील निलेश अंबिकार , मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमास शालेय सर्व विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश खाचणे, चंद्रशेखर खाचणे, विलास जंगले, आकाश साबळे, करण साबळे, दुर्गेश पेठकर, सागर नेहेते आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर माळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पढार सर यांनी केले.











