बेलव्हाळ – वराडसीम रस्ता अडकला काटेरी झुडपात !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ :- तालुक्यातील वराडसिम – बेलव्हाळ रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपे वाढली आहेत त्यामुळे वाहनधारकांना फटके बसत असून एकही अधिकारी व पदाधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे वराडसिम व बेलव्हाळ येथील सुज्ञ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या बाबत वराडसिम येथील रहिवासी व पदाधिकारी कैलास कोल्हे यांनी सोशल मीडियावर या रस्त्याचे फोटो व माहिती टाकली त्यामुळे परीसरातील नागरीकांच्या लक्षात हा प्रकार आला.

काटेरी झुडपे वाढली असल्याने एकही वाहनधारक या रस्त्याने यायला तयार नाही.आता तरी अधिकारी व पदाधिकारी याकडे लक्ष देऊन बेलव्हाळ – वराडसिम रस्ता मोकळा करतील काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Spread the love