प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – येथील पंचायत समितीच्या कार्यालयात माहिती अधिकाराच्या अपिलाच्या सुनावणी चे काम सुरू असताना गटविकास अधिकारी यांना एकाने शिवीगाळ केली म्हणून भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून समजलेली माहिती अशी की , भुसावळ पंचायत समिती चे गटविकास अधिकारी डी जी जाधव रा.जळगाव हे आपल्या पंचायत समितीच्या कार्यालयात माहिती अधिकाराच्या अपिलाची सुनावणी करीत असताना फुलगाव ता भुसावळ येथील एका इसमाने कार्यालयात येऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला व शिवीगाळ करीत धमकी दिली असल्याची फिर्याद दाखल केली आहे.या प्रकरणी भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












