प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आठवडे बाजार परिसरात असलेल्या कार्यालयात डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील अनेक गरजू लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी आबालवृद्धांनी सामाजिक कार्यकर्ते मुकूंदा भाऊ रोटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.










