गोजोरे येथे बारा गाड्या खाली आल्याने एकाचा मृत्यू !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या गोजोरा येथे गुढीपाडव्याच्या दिवशी श्री मरी मातेच्या यात्रे निमित्त बारा गाड्या आयोजन करण्यात आले होते.यंदा बारागाड्या ज्ञानेश्वर सोनवणे हे ओढत होते . यावेळी बारा गाड्या खाली आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

या बाबत सविस्तर माहिती अशी की , दि.१९ रोजी संध्याकाळी चोरवड – गोजोरा रस्त्यावर असलेल्या श्री मरी माता यात्रे निमित्त बारा गाड्या आयोजन करण्यात आले होते.यावेळी चौथ्या पाचव्या गाडी खाली एका हाताने अपंग असलेले अशोक बाबुराव कोळी (वय ५७) हे आल्याने त्यांच्या अंगावरुन गाड्या गेल्याने गंभीर जखमी झाले.जखमी अशोक बाबुराव कोळी यांना भुसावळ येथील डॉ.राजेश मानवतकर यांच्या कडे दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मयत अशोक कोळी यांच्या पश्चात पत्नी ,मुले , मुलगी असा परिवार असून ते मनमिळाऊ स्वभावाचे होते.या बाबत भुसावळ तालुका पोलीसांना माहिती देण्यात आली असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.आजतागायत बारा गाड्या सुखरूप ओढल्या जात होत्या मात्र यंदा प्रथमच अपघाती घटना घडल्याचे समजते.

Spread the love