सुनसगाव येथे किर्तन सप्ताहास सुरवात !

0
4

प्रतिनिधी  – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंती निमित्त दि.२६ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री हनुमान मंदिर प्रांगणात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात २६ रोजी हभप रमेश महाराज सुनसगाव, २७ रोजी हभप मनोज महाराज दुसखेडा , २८ रोजी हभप संजय महाराज चितोडा , २९ रोजी हभप उषाताई महाराज जळगाव ,

३० रोजी हभप सुधाकर महाराज बेलव्हाळ , ३१ रोजी हभप सुरेश महाराज तळवेल , १ रोजी डालेंद्र महाराज आसोदा तर २ रोजी हभप निवृत्ती महाराज शिरसोलीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या सप्ताहात गावातील सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र पाटील , कृष्णा शिरसाळे ,अरुण काटे , पुंडलीक कंकरे , चंद्रकांत कंकरे , प्रमोद भोळे , सुधाकर पाटील व प्रविण चौधरी हे किर्तनाचे यजमान आहेत. या सप्ताहात मृदंगमणी हभप नाना साळुंके ( कडगाव ) तर गायनाचार्य मधुकर सरोदे , सुधाकर पाटील ( पिंपळगाव ) तसेच गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थित राहणार आहे.

Spread the love