प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ -: तालुक्यातील सुनसगाव येथे आगे मोहोळच्या मधमाशांनी हल्ला केल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
येथे १ मार्च रोजी शेतात काम करणाऱ्या चारुलता भोळे, रंजना पाटील ,अनिता पाटील व एक आदिवासी पावरा अशा चार महिला मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाल्या होत्या.त्यानंतर दुसऱ्या घटनेत ६ मार्च रोजी पुन्हा आगे मोहोळच्या हल्ल्यात पंढरीनाथ कंखरे हे जखमी झाले होते. आता काही दिवसांपूर्वी विनोद हिरामण सपकाळे हे मधमाशांनी हल्ला केल्याने जखमी झाले होते आणि पुन्हा दि.२८ रोजी येथील सहकार नगरातील रहिवासी गणेश भास्कर पाटील हे येथील माध्यमिक विद्यालया जवळ पाईप लाईन खोदण्याचे काम करीत असताना याच शाळेत पाण्याच्या टाकी जवळ बसलेल्या आगे मोहोळच्या मधमाशांनी गणेश पाटील यांच्यावर हल्ला केला त्यात काय झाले हे पाहण्यासाठी आलेले अमृत नामदेव पाटील हे सुद्धा किरकोळ जखमी झाले. सतत चौथ्यांदा आगे मोहोळच्या मधमाशांनी हल्ला केल्याने नागरीक भयभीत झाले असून प्रत्येक नागरिकाने आता स्वता काळजी घ्यावी असे बोलले जात आहे.








